भारत वि. श्रीलंकाः नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या पारड्यात

। मुंबई। वृत्तसंस्था ।

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज वानखेडेच्या मैदानावर आमनासामना होणार आहे. 2011 च्या विश्वचषकाची फायनल या दोन्ही संघामध्ये याच मैदानावर झाली होती. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने वानखेडेच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंका संघाने भारताविरोधात एक बदल केलाय. धनंजय डिसल्वा याला आराम देण्यात आलाय. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवण्यात आला आहे.

भारत का जिंकणार ?
भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेतील सहाही सामने एकतर्फी जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या तगड्या संघाचा पराभव केलाय. दुसरीकडे श्रीलंका संघाला सहा सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आलेत. त्यांचे गेल्या काही दिवसांतील कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. त्यात प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. अशा स्थितीत श्रीलंका संघाला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. दुसरीकडे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक वाढलेला आहे. स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी पाहाता वानखेडेवर भारतीय संघ विजय मिळवेल, असेच प्रत्येकाला वाटत आहे.
भारतीय संघाची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
    

श्रीलंका संघाची प्लेईंग 11
दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा, दुशान हेमंता आणि दुष्मंता चमीरा.
Exit mobile version