न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर

| मुंबई । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक 2022 च्या समाप्ती नंतर टीम इंडियाला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौर्‍यासाठीचा संघ बीसीसीआयने सोमवारी (दि.31) जाहीर केला आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे टी-20 संघाची कमान हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर वनडे संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. तसेच दोन्ही संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे देण्यात आली आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्‍विन, मोहम्मद शमी यांसारखे वरिष्ठ खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यासाठी संघाचा भाग नाहीत. नोव्हेंबरनंतर भारताला डिसेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करायचा आहे.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, के. यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्‍वर कुमार, उमरान मलिक.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

Exit mobile version