अफगाण विरूध्दचा भारतीय संघ जाहीर

रोहित- विराटचे पुनरागमन

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आगामी टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन भारतीय संघाची अफगाणिस्तानविरोधात निवड करण्यात आली आहे. 16 सदस्य संघामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुनरागमन केले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे शेवटचे नोव्हेंबर 2022 मध्ये टी-20 मध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसले होते. या दोन खेळाडूंचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाल्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही खेळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अगामी टी-20 संघात या दोन्ही खेळाडूंच पुनरागमन झाल्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वावर, विराट कोहलीच्या स्ट्राइक रेटवर आणि युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी, त्यामुळे विराट आणि रोहित फक्त कसोटी आणि वनडेपर्यंत मर्यादीत राहतील, अशा चर्चा होत्या. पण आता या चर्चा फेल ठरल्या आहेत. निवड समितीने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टी-20 क्रिकेटमध्ये सामील करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा संघाची धूरा संभाळेल, असा कयास लावला जात आहे. विराट कोहलीचेही संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत या दोन दिग्गजांमुळे कोण कोणत्या खेळाडूंचं टी-20 वर्ल्डकपमधील स्थान धोक्यात आले आहे याचीही चर्चा सुरु झाली आहे. अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेतून या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे. आयपीएल 2024 पर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

अनुभवी खेळाडू संघाबाहेर
हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, आर अश्विन
अफगाण विरूध्दचा भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान.
Exit mobile version