विश्वचषकाचा भारत मुख्य दावेदार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेले तीनही विश्चचषक यजमान संघच जिंकले आहेत. जर यजमान जगज्जेते होण्याची मालिका अशीच सुरू राहिली तर यंदा भारत जगज्जेतेपदाचा चौकारही लागू शकतो. जर यजमान आणि जगज्जेते हा योगायोग जुळून आला, तर भारताला जगज्जेते होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
2011 नंतर 2015 साली पुन्हा एकदा योगायोग जुळून आला. ऑस्ट्रेलिया मुख्य यजमान होता आणि तोच जगज्जेता ठरला. जे 2015 मध्ये घडले होते, त्याची पुनरावृत्ती 2019 मध्ये झाली. 2019 मध्ये इंग्लंडने यजमान जगज्जेत्याची हॅट्ट्रिक साजरी केली. सर्वात धक्कादायक म्हणजे न्यूझीलंडचा संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हरला.
दरम्यान, गेल्या तीनही स्पर्धांत जे घडलेय, ते यंदाही घडले तर कुणाला आश्चर्य वाटणार नाही. कारण, आजघडीला भारतीय संघ तिन्ही क्रिकेटच्या प्रकारात अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारताला विश्वचषकाचा मुख्य दावेदार मानले जात आहे. दरम्यान, योगायोगही आपल्याच बाजूने आहे. त्यामुळे इतिहास घडायला भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सज्ज झाला आहे.