मुंबई:देशातील पहिली हायस्पीड वॉटर टॅक्सी सुरु

। उरण । प्रतिनिधी ।
भारतातील पहिली दोनशे प्रवाशांची क्षमता असलेली हाय स्पीड वॉटर टॅक्सी आता मुंबईत सुरू होणार आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही वेसल बनवली आहे. तिचे नाव नयन एलेव्हन असून 1 नोव्हेंबरपासून डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते मांडवा दरम्यान या नवीन वॉटर टक्सीची सेवा सुरू करण्यात आली. या बोटीच्या दिवसाला 6 फेर्‍या चालवल्या जाणार आहेत.

लवकरच बेलापूर ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत या नवीन वॉटर टॅक्सीच्या फेर्‍या सुरू होतील. यात 2 क्लास आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह क्लास, जिथे चारशे रुपये तिकीट असेल, तर दुसरा आहे बिजनेस क्लास जिथे 450 रुपये तिकीट आकारले जाईल. एक्झिक्युटीव्ह क्लास मध्ये 160 जणांची आसन क्षमता आहे तर बिजनेस क्लासमध्ये 60 जणांची आसन क्षमता आहे.

डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते मांडवापर्यंत पोहोचण्यासाठी या वॉटर टॅक्सीला चाळीस मिनिटे लागतील. तर बेलापूरपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाण्यासाठी केवळ एक तास या वॉटर टॅक्सीला लागेल.
सध्या उपलब्ध असलेल्या इतर सर्व जलवाहतुकीच्या साधनांपैकी ही वॉटर टॅक्सी सर्वात जलद आणि सर्वात सुरक्षित मानली जात आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक सीटच्या खाली लाईफ जॅकेट्स देण्यात आले आहेत. सोबतच आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यात येणारे 8 लाईफ जॅकेट देखील यावर आहेत. आगीसारखी घटना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अंतर्गत स्प्रिंकलर्स लावण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी स्मोक डिटेक्टर लावले गेले आहेत.

Exit mobile version