इंदिरा ठाकूर यांची सेवापूर्ती

। खरोशी । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षिका इंदिरा रविकांत ठाकूर यांनी आपल्या शिक्षक पेशाला पोलादपूर तालुक्यातील पैठण प्राथमिक शाळेत विद्याज्ञानाचे कार्य सुरू करून (दि.31) मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापूर्ती सोहळा आज साजरा करण्यात आला. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवणे माणसे जोडणे विद्यार्थी घडवणे शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर करण्याचे काम (35) वर्ष करून सेवानिवृत्त होत आहेत.

प्रदीर्घ उत्तम सेवेनंतर इंदिरा ठाकूर या शिक्षिका सेवानिवृत्त झाल्याने पेण तालुक्यातील रोडे शाळेत त्यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यांच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी भाऊसाहेब पोळ, कांबळे मॅडम, दिलीप कुमार, गोविंद पोळ, अरुणादेवी मोरे, राजेश गाळा, प्र.श.म्हात्रे, अमरचंद पाटील, रविकांत ठाकूर, वि.बा.ठाकूर, उज्वला निकम, अंजली पाटील, वामनराव सूर्यवंशी, डॉ.एल.बी. पाटील, शिक्षकवृंद व नातेवाईक उपस्थित होते.

Exit mobile version