औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दीक्षांत समारंभ

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दीक्षांत समारंभ रविवार दि. 17 सप्टेंबरला उत्साहात संपन्न झाला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रभारी प्राचार्या विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे गटनिदेशक के.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या दीक्षांत समारंभाला नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, थर्मॅक्स कंपनीचे उपव्यवस्थापक शशिकांत साळुंके, ॲड. महेश पवार, मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंखे, अकलाख पानसरे, विद्या बाक्कर, कस्तुरी कदम, शिल्प निदेशक एन. जे. वारे, एन. डब्ल्यू.पाटील, पी. पी. पाटील, एस.ए वावळ, एस. डी बाईत, एस. एस. भगत, वरिष्ठ लिपिक बडे आदींसह सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेतील विविध व्यवसायातील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुण प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर संपूर्ण संस्थेत प्रथम आलेला वीजतंत्री व्यवसायाचा विद्यार्थी महेश वारगुडे याचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेत प्रथम आलेला विद्यार्थी महेश वारगुडे व प्रसिद्धी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन. जे. वारे व विद्या बाक्कर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version