नेरळ रेल्वे स्थानकातील बंद रस्ते सुरु करा

शिवसेना ठाकरे गटाची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकात कोणतेही वाहन जात नाही, स्थानकात दोन्ही बाजूला फलाटाजवळ वाहन पोहचावे यासाठी रेल्वे प्रशासनाने कार्यवाही करावी आणि बंद केलेले रस्ते किमान रुग्णवाहिका आणि आपादग्रस्त काळात सुरु ठेवण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आले.

मध्य रेल्वे वरील कर्जत एन्ड कडून नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकातून माथेरान साठी मिनीट्रेन जात असते. नेरळ गावाचे नागरीकरण जोरात सुरु असून नेरळ रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळी पोहचण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरु असते. त्यात आजारी रुग्ण देखील धावतपळत वाट काढत जात असतात.अशा महत्वाच्या रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेल्या वाटा रेल्वे प्रशासनाने बंद केल्या आहेत. त्यामुळे कोणतेही वाहन त्यात रुग्णवाहिका देखील स्थानकात आणता येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे,तर याच रेल्वे कॉलनी मध्ये सरकारी रेशन दुकान आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी असल्लेया रास्ता बंद केल्यामुळे जेष्ठ नागरिकांना लाबचा फेरा मारून यावे लागते. सोबत 35 ते 40 किलो वजन धन्या घेऊन जाताना खुप मोठी कसरत करावी लागते पुर्वी चा रस्ता हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या रेल्वे पँकिग मधून रस्ता होते.आता तो रस्ता बंद केल्यामुळे जेष्ठ नागरिकांना नाहाक त्रास होत आहे.

त्यामुळे ते सर्व रस्ते सुरु करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन नेरळ शिवसेना शाखेच्या वतीने रेल्वे स्थानकातील स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आले. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कर्जत उपातालुका प्रमुख सुरेश गोमारे, कर्जत तालुका उपसंघटक सुधाकर देसाई, नेरळ विभाग पंचायत समिती अध्यक्ष चंदू बाबरे, शहर प्रमुख बंडू शिरसागर नेरळ उपशहर प्रमुख संतोष सारंग, नेरळ संपर्कप्रमुख संदेश लाड, नेरळशहर संघटक अजय गायकवाड,नेरळ माजी शहर प्रमुख भाऊ शिरसागर, माजी विभाग प्रमुख सुनील राणे आणि शिवसौनिक दत्ता मिसाळ, दादा ठाकरे हे उपस्थित होते.

Exit mobile version