| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील भिसेगाव परिसरात 45 वर्षाची अनोळखी महिला जखमी अवस्थेत आढळून आली होती. कर्जत पोलिसांनी त्या जखमी महिलेला उचलून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. या दरम्यान पोलिसांनी तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केलाअसता तिने तिचे नाव वैशाली रामा धोत्रे, (मोहपाडा, ता.खालापूर) येथे राहत असल्याचे सांगितले. उपचारादरम्यान या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तिने सांगितलेल्या मोहपाडा या पत्त्यावर तिच्या कुटुंबाशी, नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा नावाची कोणतीही महिला मोहपाडा तसेच जवळच्या वावेघर येथे राहत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अखेर कर्जत पोलिसांनी कर्जत नगर परिषदेच्या कर्मचार्यांच्या मदतीने सदर महिलेचा अंत्यविधी उरकला. अशी माहिती कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर. एस. दुसाने यांनी दिली.