माणगावातून इनोव्हा कार चोरीला

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथील जमजम अपार्टमेंटच्या बाजूस असलेल्या रिकाच्या जागेतून जुनी वापरती पाच लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार चोरून अज्ञात चोरटा पसार झाला आहे.सदरची घटना मंगळवार दि.9 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 वाजता ते बुधवार दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9:40 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची फिर्याद इस्माईल महम्मद मुकादम (वय-65) रा.वेश्‍वी ता. मंडणगड जि.रत्नागिरी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी यांच्या मालकीची असलेली राखाडी रंगाची टोयोटो कंपनीची इनोव्हा कार एम.एच.08/ए.जी.0538 तिचा चेसी क्र.एम.बी.जे.11 जेव्ही 4007530846 इंजिन क्र.2 केडीयू 770420 अशा वर्णनाची गाडी कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.या गुन्ह्याप्रकरणी घटनेतील आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे हे करीत आहेत.

Exit mobile version