प्रशासनाकडून विसर्जन ठिकाणांची पाहणी

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये गणेशोत्सव सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी शासनस्तरावर योग्य ती काळजी घेतली जात आहे. शांतता कमिटी, स्थानिक सार्वजनिक गणेश मंडळे, यांची तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याबाबत चर्चा करण्यात आली होती. प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, अधीक्षक दीक्षांत देशपांडे, पाणी पुरवठा विभागाच्या अपर्णा कंटे यांनी इंदिरा गांधी नगर येथील विक्रात युवक मंडळ व मायरा पॉईंट येथील हरिसन स्प्रिंग येथील पाण्याच्या कुंभातील गणेश विसर्जन ठिकाणी तसेच संत रोहिदास येथील बाळ गोपाळ गणेश मंडळ व सार्वजनिक वाचनालय, या विसर्जन ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करण्यात आली.

Exit mobile version