| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरालगत असलेल्या चांभार खिंड या गावात जय भवानी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्य सुषमा गोगावले उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत पूजन करण्यात येऊन मंत्रपुष्पाच्या जयजयकारामध्ये करण्यात आली.
महाड शहरालगत असलेल्या चांभारखिंड गावातील शिवप्रेमी तरुण ग्रामस्थ व जय भवानी क्रीडा मंडळ यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर विराजमान असलेली नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना मंत्रपुष्प जयघोष यामध्ये विधिवत पूजन करून करण्यात आली. यावेळी आयोजकांच्या वतीने सुषमा गोगावले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचादेखील आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाड विधानसभा संघटक राजू देशमुख, पंचायत समिती सदस्य सौ. खांबे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बिपिन म्हामुणकर, उपतालुका प्रमुख बंधु तरडे, गणेश खांबे, शरद मांडे संजय देशमुख, जाधव अन्य राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.