मृत कर्जदाराच्या नातेवाईकाला विमा लाभ

| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या मृत कर्जदाराच्या नातेवाईकांना न्यू इंडिया एशूरन्स कंपनीकडून 10 लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली. तालुक्यातील शेखाचे गाव येथील नासीर इब्राहीम कुरेशी यांनी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. या कर्जासाठी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने न्यू इंडिया एशूरन्स कंपनीकडून नासीर कुरेशी यांचा अपघाती विमा काढला होता. कुरेशी यांचे नुकतेच अपघाती निधन झाले.

न्यू इंडिया एशूरन्स कंपनीने 10 लाख रुपये विमा मंजूर केला. या रकमेचा धनादेश कुरेशी यांची पत्नी गुलशन नासीर कुरेशी यांच्याकडे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, न्यू इंडिया एशूरन्स कंपनीचे वरीष्ठ विभागीय व्यवस्थापक किशोर पाटील, श्रीकांत शिंदे, प्रमोद पाटील, अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यावेळी उपस्थित होते.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून दिल्या जाणार्‍या सर्व कर्जांचा विमा काढला जाणार आहे. बर्‍याच वेळा एखादा कर्जदार मृतं झाला तर त्यामुळे त्याच्या परिवारास आर्थिक नुकसान होते ते टाळावे म्हणून ह्या पुढे सर्व कर्जदारांना विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न असेल. – सुरेश पाटील, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक

Exit mobile version