वटपौर्णिमेसाठी बाजारात परड्या दाखल

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
मंगळवारी वट पौर्णिमा असल्याने सुहासिनींना वडाच्या पूजेकरीता लागणार्‍या बांबू वेताच्या परड्यांची घरोघरी विक्री केली जात आहे. सत्तर ते शंभर रुपयांस एक परडी या दराने ही विक्री केली जात आहे.
नवीन लग्न झालेल्या मुली नटूनथटून निरनिराळी फळे, फणसाचे गरे, पूजेचे साहित्य परड्यांतून घेऊन गावच्या वेशीवरील वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पूजाअर्चा करतात. एकमेकीला वाण देतात व दिवसभर उपवास करतात. मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागात वटपौर्णिमेच्या दिवशी हे दृश्य आजच्या मोबाईल युगातही दिसून येते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दोन-चार दिवसांपासूनच ग्रामीण भागातील बाजारपेठेत फळे, फुले व अन्य साहित्याची विक्री करून चार पैसे मिळवण्याच्या आदिवासी व अन्य गोरगरीब महिला येथे दिसून येतात. मुरूड शहर बाजार पेठेत देखील वटपौर्णिमेसाठी लागणारे फणस, पोत बांगडी, विविध प्रकारातील फळे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आलेली दिसून येत आहेत

Exit mobile version