तुपगावच्या रेशन दुकानात होणार्‍या काळ्या बाजाराची चौकशी करा

| रसायनी | वार्ताहर |
गरिबांना आधार देणारे रास्त भाव रेशनिंग दुकानांमध्ये अनेक ठिकाणी धान्य मिळत नसल्याची ओरड आहे. याविरोधात बहुजन युथ पँथर ग्राहकांच्या मदतीला सरसावली असून, खालापूर तहसील कार्यालयांतर्गत येणार्‍या चौक तुपगाव येथील रेशन दुकानात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी त्याची सखोल चौकशी करून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची लेखी मागणी बहुजन युथ पँथरचे रायगड जिल्हाध्यक्ष सुशील जाधव यांनी केली आहे. कारवाई नाही झाली तर आंदोलन केले जाईल, असा इशारा सुशील जाधव यांनी दिला आहे. खालापुरातील चौक तुपगाव येथे सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानात आहे. अनेक वर्षांपासून या दुकानदाराकडून धान्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप स्थानिक करीत असून, त्याबाबतची लेखी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकार, खालापूर पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे सुशील जाधव यांनी केली असून, लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Exit mobile version