| पनवेल । प्रतिनिधी ।
सायंकाळच्या वेळी सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लावण्यात येतात. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या गाड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सायन पनवेल महामार्गावर बेलापूरहून पनवेलच्या दिशेकडे जाताना खारघर ते कळंबोली सर्कल, मॅकडोनाल्ड हॉटेलपर्यंत काही अंतरांवर रात्री सात वाजल्यानंतर भरधाव वेगात असणार्या वाहनांना अडथळा करणार्या टपर्या चहापान नाश्त्यासाठी थाटल्या जात आहेत. तसेच याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, गोवा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या भागात जाणार्या वाहणांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे खाण्याची व्यवस्था होईल या दृष्टीने हायवेला खेटून असणार्या या टपर्यांवर वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत असते .
या टपर्यांवर सिलेंडर, रॉकेलचे स्टो घेऊन लहान साहन व्यवसाय केला जात आहे. मात्र कोणत्याही नियमांचे पालन न करता बेकायदा असलेल्या व्यवसाया मुळे मोठी दुर्घटना घडेल हे नाकारता येत नाही .
परिसरात अशा प्रकारे सुरु असणार्या बेकायदा हातगाड्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
संजय पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली