आयपीएल 2024 चा हंगाम मार्चमध्ये सुरु

| मुंबई | प्रतिनिधी |

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानात धडाकेबाज कामगिरी करताना बघण्यास चाहते दरवर्षी उत्सुक असतात. या स्पर्धेचा पुढील सिझन मार्च महिन्यातील चौथ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. आयपीएलपूर्वी महिला प्रीमिअर लीगचं (डब्ल्यूपीएल) आयोजन होणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून डब्ल्यूपीएल सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या अखेरीपासून ते मार्चच्या मध्यापर्यंत डब्ल्यूपीएलच्या मॅचेस खेळवल्या जातील. यानंतर 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होणार आहे. दोन्ही लीगची तुलना केल्यास, डब्ल्यूपीएलच्या मॅचेस फक्त दोन शहरांमध्ये होणार आहेत तर आयपीएलच्या मॅचेस विविध शहरांमध्ये खेळवल्या जातील.

डब्ल्यूपीएलच्या मॅचेस दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझी आपापल्या होम ग्राऊंड्सवर खेळतील. म्हणजेच देशभरातील 10 मैदानांवर आयपीएल मॅचेस होतील. या शिवाय, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जच्या मॅचेस त्यांच्या होम ग्राऊंड्सव्यतिरिक्त इतर दोन ठिकाणी होतील.

Exit mobile version