आयरलँँडने पाकला अखेरपर्यंत झुंजवले

| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |

भारत आणि अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर पावसाचा फटका बसल्याने पाकिस्तानचा यंदाच्या टी-20 विश्वचषकामधील आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तानने अखेरच्या सामन्यात आयरलँडला तीन गडी राखून पराभूत केले. मात्र, पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. आयरलँड पाकिस्तानला पराभूत करते की काय अशी स्थिती एकवेळ निर्माण झाली होती. मात्र, पाकिस्तानने पुनरागमन केले आणि विजय मिळवला. अखेर शाहीन शाह आफ्रिदीने दोन षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासाठी पाकिस्तानने संघर्ष केला. आयरलँडने पाकिस्तानला कडवी लढत दिली.

आयरलँडच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी कताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 106 धावा केल्या होत्या. आयरलँडला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के दिले. आयरलँडच्या पहिल्या पाच विकेट 28 धावांवर पडल्या होत्या. डॉकरेल, अडायर, लिटल यांच्या खेळीच्या जोरावर आयरलँडनं 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 106 धावांपर्यंत मजल मारली. शाहीन शाह आफ्रिदीने तीन बळी घेत आयरलँडला धक्के दिले.

पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान, एस. अयुब या दोघंनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. तर, बाबर आझमने 32 धावा केल्या. तर, फकर झमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हे खेळाडू अपयशी ठरले. अब्बास अफ्रिदीच्या 17 धावा आणि शाहीन शाह आफ्रिदी याच्या 13 धावांच्या जोरावर पाकिस्तानने विजय मिळवला.

Exit mobile version