| मुंबई | वृत्तसंस्था |
इरफान पठाण म्हणाला की, त्याने हार्दिकवर टीका केली. कारण आयपीएल 2024 मध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. इरफान म्हणाला, “हार्दिक पंड्यासाठी हा प्रवास खास होता. त्याने टीकेतून स्वत:ला यशस्वीपणे सावरले आणि पुनरागमन केले. आयपीएलदरम्यानची कामगिरी चांगली नसल्यामुळे हार्दिकवर टीका करणाऱ्यांमध्ये मीही होतो. त्यावेळी हार्दिकने अनेक चुका केल्या होत्या.” इरफान पठाण पुढे म्हणाला, “तेथून परत येणे आणि विश्वचषक जिंकणे विशेष होते. त्यांने आपली प्रतिभा सिद्ध करताना दमदार प्रदर्शन केले. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासोबत त्याने भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण स्पर्धेत त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली ते खूप खास आहे.