लोखंडी सळ्या चोरणारा अटकेत

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुकयातील वाजे फाटा येथे नवीन ब्रिज बनविण्याचे काम सुरू असून, त्याठिकाणी उघड्यावर ठेवलेल्या लोखंडी सळ्या चोरून नेणार्‍या दोघांपैकी एकाला पनवेल तालुका पोलिसांनी रिक्षासह ताब्यात घेतले आहे.

पनवेल तालुक्यातील वाजे फाटा येथे नवीन ब्रिज बनविण्याचे काम सुरू असून, त्याठिकाणी उघड्यावर ठेवलेल्या लोखंडी सळ्या चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, विजय देवरे, सुनील कुदळे, पोलीस शिपाई आकाश भगत आदींचे पथक गुप्त बातमीदार, व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना वसीम उर्फ सोनू महमूद आलम शेख (26) रा. मुंब्रा याला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्याकडून जवळपास दहा हजार रुपये किमतीच्या चोरीच्या सळ्या व गुन्ह्यातील रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास हवालदार महेश धुमाळ करीत आहेत.

Exit mobile version