तलावात आढळला इसमाचा मृतदेह

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल जवळील धाकटा खांदा येथील गणपती विसर्जन तलावात आज सकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. येथील गणपती विसर्जन तलावात आज सकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तातडीने कामोठे पोलिसांना कळविली त्यानुसार पोलिसांचे पथके घटनास्थळी पोहचून त्यांनी सदर मृतदेह बाहेर काढला . सदर मृतदेहाच्या खिशामध्ये काही कागदपत्रे व फोटो आढळून आले आहेत . त्यानुसार कामोठे पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम तसेच या इसमाने येथे जीव का दिला किंवा काही घातपाताचा प्रकार आहे का ? त्या दृष्टीने कामोठे पोलीस तपास करीत आहेत .

Exit mobile version