| रोहा | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक काम अत्यंत उत्तम चालले आहे. संस्थेच्या माध्यमातून निरनिराळे स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत. मात्र वाढत्या वयामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना मदत करून दिलासा देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे रोहे ज्येष्ठ संघटनेचे अध्यक्ष पी.बी.सरफळे यांनी ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित केलेल्या सभेत बोलताना सांगितले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष एस.एन. गायकवाड, सचिव सुरेश मोरे, खजिनदार प्रकाश पाटील, महंमदशेठ डबीर, शरद गुडेकर, अशोक जोशी, दत्तात्रेय तवटे, अनुराधा धुमाळ, शैलजा सुभाष देसाई, नंदकुमार भादेकर व शेखर गुंड असे सुमारे 100 सदस्य उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना पी.बी.सरफळे पुढे म्हणाले, आपल्या संघटनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे वाढ दिवस साजरे करणे. त्यानिमित्ताने त्यांना श्रीफळ व गुलाब पुष्प प्रदान करून अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्यामुळे समाधान मिळते. तसेच इतर संघटनेकडून ज्येष्ठ नागरिकांना चालणे सुलभ व्हावे म्हणुन स्टिक व आरोग्यासाठी मोफत उपचार आरोग्य तपासणी केली जाते. त्यामुळे खूप समाधान मिळते. शासकीय कामे, प्रवास आणि इतर आवश्यक कामे संघटनेमार्फत अध्यक्ष पी. बी. सरफळे रावसाहेब यांनी करण्याचे सभेत सांगितले.







