पित्यानेच केली मुलाची हत्या

। ठाणे । वृत्तसंस्था ।

शहापूर तालुक्यातील वाशाळा खुर्द गावात धक्कादायक घटना घडली आहे. बापाने आपल्या 8 वर्षाच्या मुलाच्या तोंडात कागदाचा बोळा कोंबून त्याची हत्या केली आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

शहापूर तालुक्यातील वाशाळा खुर्द गावात एकनाथ हा आपल्या बायको आणि दोन मुलांसोबत राहत होता. मात्र, एकनाथ याला मद्यपान करण्याची सवय लागल्याने नवरा बायकोमध्ये भांडण होत. त्यामुळे त्याची बायको गेली चार महिने वेगळी राहत आहे. या भांडणांमुळे त्याचा मुलगा युवराज हा त्याला शिवीगाळ करायचा. त्यामुळे एकनाथ यांना संताप यायचा.

सोमवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास मृतक युवराज अचानक बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. मात्र, युवराज कुठेही सापडला नाही. दुसऱ्या दिवशी शोध घेत असता आरोपीच्या घरापासून काही अंतरावर युवराजचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी त्याच्या तोंडात कागदाचा बोळा कोंबलेला असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती कसारा पोलीस पथकाला मिळताच पोलीस पथक घटनास्थळी हजार झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी रवाना केला. तसेच, कसारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

मात्र, मृतकचा बाप पोलीस चौकशीत योग्य मदत करीत नसल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी एकनाथने मुलाच्या हत्येची कबुली दिली.

Exit mobile version