विश्वासू कामगारानेच केली दागिन्यांची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

घरातील विश्वासू कामगारानेच कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार आबिद अली मलिक हे पारपुंड गाव येथे राहत असून त्यांच्या एनएफ युनिसेफ सलून या दुकानात शाहरूख हा काही महिन्यांपासून काम करत होता. दुकानात व घरातील कामात मदत करत त्याने आबिद यांचा विश्वास संपादन केला होता. सप्टेंबर महिन्यात आबिद यांच्या आईचे निधन झाल्याने ते उत्तर प्रदेशला गेले. त्यावेळी त्यांनी शाहरुखकडे दुकान व घराची चावी दिली. या दरम्यान, शाहरूखने काम करायचे सोडून दिले आणि घराची चावी दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवून निघून गेला. त्याला फोन करूनही तो फोन उचलत नव्हता. आबिद हे उत्तर प्रदेशातून पारपुंडला परतल्यानंतर त्यांना कपाटात ठेवलेले चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख 15 हजार रुपये आढळून आले नाही. तेव्हा त्यांनी शाहरूख विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवत शाहरुखचा शोध सुरू केला आहे.

Exit mobile version