जाखमाता मंदिराचा वर्धापनदिन

| अलिबाग । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील परहूर-परहूरपाडा गावातील जाखमाता मंदिराचा 14 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी अभिषेक, होमहवनाचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, सकाळपासूनच पंचक्रोशितील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहात देवीचे दर्शन घेतले. रात्री भजनांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भजनप्रेमी उपस्थित होेते.


या कार्यक्रमासाठी जनार्दन घरत, लक्ष्मण पाटील, नरेंद्र घरत, विकास खोपकर, सुधीर पाटील, विनोद खोपकर, अभिमन्यू नाईक, रमेश पाटील, तुकाराम गुजांळ, दिनकर बुरुमकर, दत्तराम बायगुळकर, सुनिल पाटील, मनोहर पाटील, विलास खोपकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मंदिरास आकर्षक रोषणाई करण्याचे काम मधुकर म्हात्रे यांनी, तर देवीच्या मूर्तीला रंगरंगोटी आशिष घरत यांनी केली. त्यांचे ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.

Exit mobile version