मुशेतमध्ये जलसा कार्यक्रम उत्साहात

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील प्रमुख उरुसापैकी एक असणारे मुशेत येथील पिर अहमद शाह बाबा (सय्यद कादिरी शाह बाबा) दर्ग्याचा उरूस शनिवारी (दि.24) मोठ्या उत्साहात पार पडला. या उरुसात हिंदू-मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. उरुसाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. 25) मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा अध्यात्मिक जलसा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक कुराणाचे वाचन व पठण करून सर्वांनाच मंत्रमुग्ध सर्व उपस्थितांची मने जिंकली. सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करत त्यांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाला मुशेत पंचक्रोशीतील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मुफ्ती व मौलाना यांनी विद्यार्थ्यांच्या वाचन व पठण यावर मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांनी यामध्ये सातत्य ठेवत अधिकाधिक प्रगती केली पाहिजे, यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात मान्यवरांसह व मुशेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version