| महाड | प्रतिनिधी |
शासनाच्या योजनेचा एक भाग म्हणून महाड शहरांतील कोकण कार्डिऑक केअर हॉस्पिटलमध्ये हृदयविकार रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु झाली आहे. या योजनेचा लाभ गरीब गरजू रुग्णांनी घ्यावा. त्याचप्रमाणे या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवावी, असे आवाहन डॉ. आदित्य म्हामणकर यांनी केले आहे.
या योजनेसाठी आयुष्यमान योजनेत येणाऱ्या रुग्णांना योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत येणाऱ्या लोकांनी लोकांनी तात्काळ आयुष्यमान योजनेच कार्ड काढावे, असे आवाहनही डॉ. म्हामणकर यांनी केले आहे. ही योजना तीन टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिल्या टप्यात न्जोप्लास्टिक, दुसऱ्या टप्प्यात (लखवा हार्ट ॲटेक निमोनिया ) यासारखे गंभीर आजारामध्ये अशा रुग्णांना आयसियूमध्ये उपचार प्रणालीचा वापर असेल, तर तिसऱ्या टप्यात इतर काही आजांरासह सामान्य आजारांचा समावेश यासह इतर शस्त्रक्रिया आदींचा समावेश असणार आहे. महाडच्या कोकण कार्डिकेअर या सेंटरमध्ये आतापर्यंत गेल्या दहा वर्षात 1000 ॲन्जोग्राफी व 200 वर ॲन्जोफ्लास्टिकच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. म्हमणकर यांनी केले आहे.







