स्व. जनार्दनशेठ कोळी स्मृतीचषक टेनिस क्रिकेट स्पर्धा

नागोठणे संघाने पटकाविला : वेलशेत संघ ठरला उपविजेता

| नागोठणे | प्रतिनिधी |

नागोठणे विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विभागातील थोर सामाजिक कार्यकर्ते दिवंगत जनार्दनशेठ कोळी यांच्या स्मृतिंना उजाळा मिळण्यासाठी श्री जाखमाता एम.आय.जी वेलशेत व संतोषभाई कोळी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेलशेत येथील भव्य मैदानावर 19 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या स्व. जनार्दनशेठ कोळी स्मृतिचषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचा सल्लू बिट्स नागोठणे संघ विजेता ठरला आहे. या संघाला आकर्षक चषक व 30 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तर श्री. जाखमाता वेलशेत हा संघ उपविजेता ठरला. वाय.जी.एस. वरवठणे या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. या संघांना अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात आला. या स्पर्धेचा मालिकावीर जाखमाता संघाचा पंकज बावकर, उत्कृष्ट फलंदाज सल्लू बिट्स नागोठणे संघाचा अमित नाकती, उत्कृष्ट गोलंदाज वरवठणे संघाचा तन्मय म्हात्रे व सामनावीर म्हणून सल्लू बिट्स नागोठणे संघाचा नितेश पैर यांना गौरविण्यात आले.

Exit mobile version