जरांगेंनी पुन्हा दंड थोपटले

| गडचिरोली | प्रतिनिधी |

गोरगरीब मराठ्यांच्या अस्तित्वाशी खेळण्याचं काम सरकार करत आहे. पुढच्या काळात सरकारने हे करू नये. नाहीतर मला नाईलाजाने जून महिन्यात पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागेल असा इशारा मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जून महिन्यात विद्यार्थ्यांचे ॲडमिशन सुरू होतात, त्यांचे ॲडमिशन जर रद्द झाले तर मी ऐकणार नाही, एकाही मंत्र्याचं ऐकूनही घेणार नाही. हे राधाकृष्ण विखे यांनी लक्षात घ्यावं असंही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटलांनी म्हटले की, सरकारने देऊन द्यायचं तर हे आधीच करायला पाहिजे होतं, इतक्या दिवस विनाकारण समाजाचा छळ का करायचा? गोरगरिबांच्या प्रवेशाचा प्रश्न असतो शिक्षणाचा प्रश्न असतो. फडणवीस यांनी मोठ्या मनाने हा जीआर काढला, त्याला शिंदेंचा सुद्धा सपोर्ट आहे मग अडवणूक का करायची? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्यावर समाजाने विश्वास टाकला आहे. विखे पाटलांनी जीआर काढला की मराठवाड्यातला मराठा 100% आरक्षणात जाणार, मग हा जो विश्वास टाकला त्या विश्वासाचा गैरविश्वास विखे यांनी होऊ देऊ नये. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या व्हॅलिडीटी दिल्या जात नाही. स्थानिक चौकशी अहवालानुसार जर चौकशी केली असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत आहे असा प्रश्नही जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version