अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग या स्पर्धेत जय संतोष कवळे नवेदर नवगांव आणि रोहन अरुण गुरव रामनाथ अलिबाग या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवून त्यांची 26 ते 29 गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली म्हणून समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटंम शेठ यांनी जिल्हा परिषद चहा दालनात जय आणि रोहन यांना आर्थिक मदत व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच कराटे प्रशिक्षक संतोष कवळे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.