रेवदंडा क्रिकेट स्पर्धेत जय बजरंग विजयी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा हरेश्‍वर मैदानात श्रावणी स्पोर्टस् चौल आयोजित सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जय बजरंग तळेखार संघ अंतिम विजेता ठरला. तर व्दितीय क्रमांक माऊ इलेव्हन थळ, तृतीय क्रमांकाचा मानकरी कोपरखैरणे संघ ठरला. या स्पर्धेत उत्कृष्ट फलदांज माऊ इलेव्हन थळ संघाचा रोशन पाटील, उत्कृष्ट गोलदांज कोपर खैरणे संघाचा अतुल, सामनावीर जय बजरंग तळेखार संघाचा विजय घाणेकर यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे उद्धाटन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, यावेळी चौल उपसरपंच अजित गुरव, ग्रा.प.सदस्य निलेश नाईक, कल्याणी बाजी, अतुल वर्तक, बाबू दक्षिकर, आदित्य घरत, प्रतिक नाईक, अमोल म्हात्रे, अमोल घरत आदी उपस्थित होते. बक्षिस वितरण अजित गुरव, अतुल वर्तक, निलेश नाईक यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये 50 हजार रोख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 25 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 25 हजार व भव्य चषक, चतुर्थ क्रमांकास रूपये 25 हजार रोख व भव्य चषक. तसेच प्रत्येक सामन्यास मॅन ऑफ द मॅच, स्पर्धेत उत्कृष्ट गोलदांज, उत्कृष्ट फलदांज, मालिकावीर आदी चषक मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आली. स्पर्धेत समालोचन सौरभ भुरे, निरज बनिया हे काम पहात असून पुरूषोत्तम भगत व प्रतिक नाईक, आदित्य नाईक, विक्रम सुर्वे आदी अ‍ॅम्पायरचे काम पाहिले. तर गुणलेखनाचे काम बाळकृष्ण धरणे यांनी केले. या स्पर्धेत एकूण 24 संघाना थेट प्रवेश देण्यात आला होता, तर एकूण आठ संघांची तीन गटात लढत झाली.

Exit mobile version