जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटूंबियांचे सांत्वन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुर्यकांत म्हात्रे (आप्पा) यांचे गुरूवारी (दि.1) निधन झाले. निधनासमयी ते 75 वर्षांचे होते. सुर्यकांत म्हात्रे हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. थेरोंडा पानसेवाडी परिसरात पक्ष वाढीसाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ते राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात देखील सक्रीय होते. दरम्यान, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी सोमवारी (दि.5) थेरोंडा पानसेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन म्हात्रे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच त्यांनी नितीन म्हात्रे, निलेश म्हात्रे यांच्यासह म्हात्रे कुटूंबियाची विचारपूस केली. यावेळी आप्पांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या पक्षनिष्ठ कार्याचा, साध्या-सरळ स्वभावाचा आणि सर्वांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. याप्रसंगी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत, त्यांना धीर देत आप्पांची आठवण आणि त्यांनी केलेले कार्य सदैव आपल्या सोबत राहील, अशी भावना व्यक्त केली. यावेळी अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रेवदंडा येथील शेकापचे ज्येष्ठ नेते सुरेश खोत, शेकापचे रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत, शरद पाटील, अभय ठाकूर, संगीता पाटील तसेच शोकाकूल नितीन म्हात्रे, निलेश म्हात्रे आणि त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते.

Exit mobile version