जिल्हा पत्रकार संघातर्फे जयंती साजरी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बहुजन समाजाचे नेते, माजी आमदार, झुंझार पत्रकार व कृषीवलचे संस्थापक स्व. नारायण नागू पाटील यांची जयंती रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे राम-नारायण पत्रकार भवनात साजरी झाली. यावेळी स्वर्गीय ना. ना. पाटील यांच्या प्रतिमेस सखाराम पवार यांनी पुष्पमाला चढविली. यावेळी बळवंत वालेकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, शरद कोरडे, चारुशीला कोरडे, बाळू पवार, नंदू तळकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version