। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन अलिबाग येथील “राम – नारायण” पत्रकार भवनात उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे सल्लागार सखाराम आण्णा पवार, ज्येष्ठ पत्रकार साप्ता.कुलाबा वैभव चे संपादक श्री बळवंत वालेकर, ज्येष्ठ नाट्य कर्मी व साहित्यिक शरद कोरडे तसेच सौ.चारुशीला कोरडे ,हेमकांत सोनार, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.ज्योती म्हात्रे तसेच अन्य वाचक यावेळी उपस्थित होते.
सदर यावेळी कुलाबा समाचारकार व जेष्ठ पत्रकार रामभाऊ मंडलिक यांच्या प्रतिमेला श्री सखाराम आण्णा पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण आले. तसेच कृषीवलकार व श्रमजीवी जनतेचे नेते स्व.नारायण नागू पाटील तथा आप्पासाहेब यांच्या प्रतिमेस जेष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कृषीवल चे माजी संपादक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेला शरद कोरडे यांनी पुष्पहार अर्पण करण्यात आले.