| उरण | वार्ताहर |
आद्य शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त भाई जगताप मित्र मंडळ रायगड, काँग्रेस सेवा फाऊंडेशन रायगड, मधूशेठ ठाकूर चँरिटेबल ट्रस्ट रायगड, रायगड शिव कला मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील 3 जानेवारी 2024 रोजी भव्य दिव्य कार्यक्रमात देण्यात येणारा कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2024 हा लोक शाहिर वैभव धनाजी घरत यांना जाहीर झाला आहे. लोक शाहिर घरत यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
वैभव घरत यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
