गोपाळ म्हात्रे यांना जीवन गौरव पुरस्कार

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गोपाळ दिनकर म्हात्रे यांना सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल रविवारी (दि.25) कला साहित्य संमेलन ठाणे येथे वेध फाउंडेशन कोल्हापूर, समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, अनुश्री महिला संस्था नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2024 सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातिल एकूण विविध क्षेत्रात काम केलेल्या 70 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला.

या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण शिवणेकर, जयराज नायर यांच्या हस्ते पुरस्कारमुर्तींना पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी अभिनेत्री नूतन जयंत, नेहा निनाद धुरी, डॉ.अ.ना. रसनकुटे, डॉ.रागिणी चवरे, राजेश्री बोहरा, डॉ.बी.एन. खरात, राजेश्री काळे, श्‍वेता शिर्के, डॉ. सनी वालिका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version