| महाड | वार्ताहर |
रेल्वे प्रवासादरम्यान वीर रेल्वे स्टेशनजवळ 3 लाख 60 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरीची घटना रविवारी (दि.15) सप्टेंबर रोजी घडली आहे. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि.15 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रवासी दिवा सावंतवाडी ट्रेनने प्रवास करीत असताना महाड तालुक्यातील विर रेल्वे स्टेशन जवळ दुपारी चार ते सायंकाळी पाच वाजण्याचे दरम्यान मुंबई-बोरीवली येथील महिला फिर्यादी मुळ राहाणार तालुका खेड, जिल्हा रत्नागीरी या दिवा सावंतवाडी ते बोरीवली असा रेल्वेने प्रवास करीत असताना विर रेल्वेस्टेशनच्या जवळ 5 मिनीटे अगोदर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या जवळील मोठ्या पर्समध्ये ठेवलेला मोबाईल बाहेर काढला. त्यावेळी फिर्यादीच्या खांद्याला लावलेल्या गुलाबी रंगाची व राखाडी रंगाचे पट्टे असलेली मोठ्या पर्समध्येठेवलेली काळ्या रंगाची एकूण 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागीने ठेवलेली लहान पर्स कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवुन चोरुन नेली. याबाबत महाड तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई खुशल खेडेकर हे करीत आहेत.