| पनवेल | वार्ताहर |
लाकडी कपाटाचे लॉकर उघडून लॉकरमध्ये ठेवलेले 5 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्या प्रकरणी चोराविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमती पॅराडाईज, करंजाडे, कोपर येथील विद्या म्हात्रे यांच्या घरात अनोळखी इसमाने प्रवेश केला. अलमारीत ठेवलेल्या चावीने लाकडी कपाटाचे लॉकर उघडले आणि लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचा हार, अंगठी, ब्रेसलेट असे पाच लाख 75 हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.