कार्ले येथे चोरटयाने मारला दागिन्यांवर डल्ला

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील कार्ले-खंडाळे येथे अज्ञात चोरटयाने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारीत 68 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, 25 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते 26 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान कार्ले खंडाळे येथील विजय सदानंद भगत यांच्या बंद घराचे टाळे अज्ञात चोराने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्याने घरात असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 68 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना लक्षात आल्यानंतर याप्रकरणी विजय भगत यांनी अलिबाग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर अज्ञात चोरटयावर घरफोडी, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार गभाळे करीत आहेत.

Exit mobile version