झुंझार-पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा; प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल अंतिम विजयी

। पोयनाड । प्रतिनिधी ।
झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या षष्टब्दीपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजित बारा वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी भेंडखल क्रिकेट अकॅडमी उरण व प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल ह्या संघामध्ये झुंझार युवक मंडळाच्या क्रीडांगणावर झाला त्यामध्ये प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघांनी बाजी मारत अंतिम विजयी संघ म्हणून मान मिळाला आहे. ह्या स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 12 संघांनी सहभाग घेतला होता, साखळी व बाद पद्धतीने सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 22 दिवस असणार्‍या स्पर्धेचा अंतिम सामना मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारलेल्या प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघांनी 40 षटकांच्या अखेरीस सर्व गडी गमावत 199 धावा काढल्या, मधल्याफळीतील डावखुरा आतिशी फलंदाज पार्थ पवार यांनी सुरेख फलंदाजी करत 35 तर शौर्य गायकवाड यांनी धुवाधार खेळी करून 44 धावा ठोकल्या.भेंडखळ संघाकडून कर्णराज देशमुख यांनी 3 तर अंजली गोडसे व वेड कडू यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.200 धावांचे लक्ष घेऊन फलंदाजी आलेल्या भेंडखळ संघाचे सलामीचे फलंदाज बाद झाल्या नंतर मधल्याफळीतील फलंदाज जिद्दनेश म्हात्रे व आशिर्व पाटील यांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरण्याचा पर्यंत केला डावखुरा तंत्रशुद्ध फलंदाज जिद्दनेश म्हात्रे यांनी 25 तर संयमी फलंदाजी करणारा आशिर्व पाटील यांनी 20 धावा काढल्या, दोन्ही फलंदाज बाद झाल्या नंतर भेंडखळ संघ डगमगला पनवेल संघाचा फिरकी गोलंदाज अथर्व पाटील यांनी 3 तर आर्यन जाधव,पंकज इटकर,दक्ष आवले,झाइद खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.भेंडखळ संघाचा संपूर्ण डाव 77 धावांनवर आटोपला.पनवेल संघांनी अंतिम सामना 122 धावांनी जिंकला.स्पर्धेचे संपुर्ण नियम व नियमावली उरणचे क्रिकेट तज्ञ व प्रशिक्षक नायन कट्टा यांनी अधोरेखित केले होते त्यामुळेच स्पर्धा शिस्तबद्ध व शांततेत पार पडली. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून अथर्व पाटील,संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्टपणे फलंदाजी करणार्‍या जिद्दनेश म्हात्रे,आरुष कोल्हे यांना बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून ईशान पाठक तर संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर म्हणून पार्थ पवार यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जावेद पटेल यांच्याकडून प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाला तर नकुल काळे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे चषक भेंडखळ संघाला देण्यात आले.बक्षिसवितरणाच्याया कार्यक्रमासाठी डॉ.राजाराम हुलवान,अनंत राऊत, स्वप्नील पाटील,अजित चवरकर ,रत्नाकर तावडे अन्वर बुराण, किशोर तावडे, दिपक साळवी, अजय टेमकर, सुजित साळवी, अँड.पंकज पंडित, संकेश ढोळे, आदेश नाईक सह पोयनाड विभागातील क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version