| खांब | प्रतिनिधी |
जीवनधारा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विस कोलाड येथे दि.25 ते 30 एप्रिलपर्यंत पाच दिवसांचे उन्हाळी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. एडुएल दी प्रोजेक्ट व जीवनधारा यांच्या संयुक्त विद्यमानाने पाच दिवसीय समर कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी 36 वाड्यांमधून सुमारे शेकडो मुलांनी महत्वपूर्ण उपस्थिती नोंदवून विविध उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने केली व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले होते.
मुलांचे व मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले. या पाच दिवसांमध्ये मुलांना सोबत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. पाच दिवसीय उन्हाळी शिबिरामध्ये सकाळच्या सत्रांमध्ये इंटेनशिव लैंग्वेज कन्सेप्ट, दुपारनंतर क्रोशे पेंटिंग, क्ले फ्लॉवर आर्ट्स, आर्ट्स प्ले, डान्स थेरेपी, स्पोर्ट्स डे, मेहंदी, प्लेस गेम्स, फिल्म इंग्लिश व गणित आदी विषय घेण्यात आले होते.
मुलांनी पाच दिवसात विविध उपक्रमात सहभाग नोंदवून आनंद लुटून व नवीन नवीन गोष्टी शिकून आत्मसात केल्या. शिबिराचे शेवटच्या दिवशी विविध उपक्रमात यशस्वी ठरलेल्या मुलांना बक्षीसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व मुलांनी नाश्ता व जेवणाचा आनंद लुटला अशा प्रकारे पाच दिवसीय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये समर कॅम्प हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या शिबिराचे यशस्वीतेसाठी जीवनधारा संस्थेच्या सर्व कार्यकर्ते मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले.







