| उरण | वार्ताहर |
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त मंगळवार (दि. 23) मे पासून जेएनपीए प्रशासन भवनासमोर बेमुदत सामुदायिक उपोषण सुरू करणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. अनेक वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी अनेकवेळा निवेदन, मोर्चे काढूनही ते मार्गी लागत नाही. याची सुरुवात म्हणून विविध मागण्यांसाठी सामुदायिक उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. तरी या उपोषणात प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन कमिटीने केले आहे.