| पनवेल | प्रतिनिधी |
तोंडरे गावात पावसाळ्यात विविध कारखान्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे दरवर्षी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याच्या तक्रारींवर संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या समस्येबाबत संबंधित कारखाने तसेच प्रशासनाला यापूर्वी लेखी पत्र देण्यात आले होते. बैठकीदरम्यान ग्रामस्थांच्या अडचणींची सविस्तर मांडणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन दिले. पावसाचे पाणी योग्य मार्गाने वाहून जाण्यासाठी नालेसफाई व पाणी व्यवस्थापनाबाबत उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. यावेळी नगरसेवक राम पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, तसेच नगरसेवक प्रकाश म्हात्रे उपस्थित होते. गावकऱ्यांनी लवकरात लवकर ठोस उपाययोजना करून पूरस्थिती टाळावी, अशी मागणी केली आहे.







