जॉन्टी रोड्स भारताचे नवे प्रशिक्षक?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा लवकरच होणार आहे. बीसीसीआयने याबाबतची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून, माजी सलामीवीर गौतम गंभीर हा या पदासाठी प्रबळ दावेदार आहे. आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू जॉन्टी रोड्स यांना भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. याबाबत गौतम गंभीरने रोड्स यांच्याशी चर्चा केली आहे.

गौतम गंभीरने सहाय्यक कर्मचार्‍यांमध्ये सामील होण्याबाबत जॉन्टी रोड्स यांच्याशी चर्चा केली आहे. गंभीरने रोड्स यांना त्यांची इच्छा विचारली. जर गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला, तर जॉन्टी रोड्स यांचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून स्थानही जवळपास निश्‍चित आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या दोघांनी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी एकत्र काम केले असून, त्यांच्यामध्ये खूप चांगला समन्वय आहे.

Exit mobile version