मालमत्ताकरावर जूनमध्ये सुनावणी

| पनवेल | वार्ताहर |

मालमत्ता कराच्या विरोधात खारघर फोरमने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी नुकतीच मुख्य न्यायमूर्ती गंगापूरवाला व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यापुढे झाली. या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्तींनी प्रथम पनवेल महापालिकेची बाजू ऐकून घेतली आहे, तर खारघर फोरमला बाजू मांडण्यासाठी 30 जूनमध्ये पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

पनवेल महापालिकेकडून आकारण्यात येणार्‍या मालमत्ता कराविरोधात खारघर फोरमकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात घेण्यात आली. यावेळी खारघर फोरमच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत सीनियर कौन्सिल व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अनिल साखरे यांनी बाजू मांडली. यावेळी ड. समाधान काशीद, ड. मंदार लिमये व याचिकाकर्त्या माजी नगरसेविका लीना अर्जुन गरड उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, मालमत्ता करासंदर्भात खारघर फेडरेशनने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळलेली आहे. त्यामुळे खारघर फोरमच्या याचिकेवर कोर्टाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version