| पनवेल | वार्ताहर |
नेवाळी येथील एका घराच्या दाराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील साडेअकरा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रमोद दशरथ खांडेकर हे नेवाळी, पनवेल येथे राहत असून, त्यांच्या घरातील सर्वजण गावातील नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांनी दरवाजाला कुलूप लावला होता. कार्यक्रम संपल्यानंतर प्रमोद खांडेकर व त्यांची पत्नी मुलासह घरी आले असता त्यांनी मुख्य दरवाजा उघडला असता दरवाजा आतून बंद असल्याचे जाणवले. त्यामुळे ते पाठीमागील दरवाजाकडे गेले असता पाठीमागचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यांनी आत मध्ये जाऊन पाहिले असता लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. आणि बेडवर सोन्याचे दागिने ठेवण्यासाठीचे बॉक्स पडलेले होते. चोराने त्यांच्या घरात प्रवेश करून आठ तोळे वजनाची सोन्याची गंठण, सोन्याचा चोकर, चैन, अंगठी, टोंगल, रिंग, कुडी असे एकण साडेअकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.