ज्युनियर मुलांची निवड चाचणी

क्रिकेट स्पर्धा उरणाला

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ज्युनियर (19 वर्षांखालील) मुलांची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा उरण येथे 23 जानेवारीपासून खेळविण्यात येणार आहे. ही स्पर्धा उरण येथील उरण क्रिकेट अँड स्पोर्टस असोसिएशनच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 40 षटकांची साखळी व बाद पद्धतीने स्पर्धा खेळावली जाईल अशी माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. 1 सप्टेंबर 2004 किंवा त्यानंतर जन्मलेले जिल्ह्यातील रहिवासी असलेले खेळाडू ह्या स्पर्धेत खेळण्यास पात्र असतील. जिल्ह्यातील संघाना ह्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल, त्यांनी स्पर्धा शुल्क 11800 रुपये 18 जानेवारी पर्यंत, जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या बँक खात्यात (बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्र. 60264495336, IFSC M-HB0001597) जमा करावेत.

स्पर्धेत खेळणार्‍या 15 खेळाडूंची संघ यादी सोबत सर्व 15 खेळाडूचे आधारकार्ड प्रत, खेळाडूंच्या वयाचा दाखला, स्पर्धा शुल्क भरल्याची माहिती, संघाची आवश्यक कागदपत्रे 19 जानेवारी पर्यंत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव सचिव प्रशांत ओक पेण किंवा districtcricket.raigadgmail.com या ई-मेल वर पाठवावी. ही माहिती जमा केल्यानंतरच संघाचा स्पर्धेतील सहभाग निच्छित होईल. स्पर्धेत सहभाग निच्छित झालेल्या संघांनाच स्पर्धेचे वेळापत्रक व नियमावली पाठवण्यात येईल. अधिक माहितीसाठी प्रशांत ओक 9822422676, प्रकाश पावसकर 7977012742, किरीट पाटील -8898015285 ह्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रशांत ओक यांनी केले आहे.

Exit mobile version