| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ सोमवारी (दि.2) अलिबागमधील जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर. तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी जिल्हा न्यायाधीश-3 एस.डी. भगत, न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तेजस्विनी निराळे, अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ए.डी.पाटील, सचिव अमित देशमुख, अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. हा उपक्रम मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली असून 30 मार्चपर्यंत जिल्ह्यात फिरते लोक अदालत असणार आहे. यादरम्यान, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केला जाणार आहे. तसेच, नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. फिरत्या लोक अदालतीसाठी श्रीकांत उपाध्ये (निवृत्त न्यायाधीश) यांची कक्ष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
‘न्याय आपल्या दारी’ उपक्रम
