। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या महिला संचालकपदी (स्वतंत्र) महापारेषणच्या पुणे परिमंडळातील अधीक्षक अभियंता ज्योती चिमटे यांची नियुक्ती झाली आहे. चिमटे या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील विद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी पदवीधर आहेत. 1998 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये त्या कनिष्ठ अभियंता या पदावर रूजू झाल्या होत्या. तदनंतर, महापारेषण कंपनीत त्यांनी सरळसेवा व बढतीव्दारे विविध पदांवर काम पाहिले. 2017 पासून त्या अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत आहेत.