फायबरचे दरवाजे बसविण्यासाठी निधी अभाव
। बोर्ली पंचतन । प्रतिनीधी ।
साडेतीनशे हेक्टर यशवंत खारभूमी फायबरच्या दरवाजा अभावी नामशेष होण्याच्या मार्गावर असून शेतीप्रधान भारत देशात मात्र साडेतिनशे हेक्टर यशवंती खारभूमी वाचविण्यासाठी फायबरचे दरवाजे बसविण्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध नसावा ही मोठी गांभिर्याची बाब आसून यशवंत खारभूमी शेतकर्याची आता शोकांतिका झाली आहे.
समुद्राच्या खार्या पाण्याच्या विळख्यातून सोडविण्याची आता पहिली जबाबदारी यशवंत खारभूमीमध्ये शेती कसणार्या शेतकरी बाधंवाची असून त्यांनी डोळ्यात तेल घालून शेतीचे संरक्षण करायला हवे अन्यथा लाकडी दरवाजा ऐवजी फायबरचे काय पण सोन्याचे जरी बसविले तरी ते कोणीतरी नत द्रष्ट तोडणारच तेव्हा खारभूमी करणार्या शेतकर्यांनी आपल्या शेतभूमीच्या संरक्षणासाठी सावध रहावे अशी विनंती बोर्ली पंचतन येथील सामाजिक कार्यकर्ते महमद मेमन यांनी केली आहे.
दिवेआगर आणि बोर्ली पंचतन यांना जोडणारी अथांग अशी साडतीनशे हेक्टर यशवंत खारभूमीची फार मोठी व्यथा आहे. समुद्रालगत असणारी यशवंत खारभूमीमध्ये मागील गेले अनेक वर्ष समुद्राच्या भरतीचे पाणी येत असताना ही यशवंत खार पिकली पाहीजे या खारीवर अवलंबून असणारा शेतकरी जेवला पाहीजे यासाठी बोर्ली पंचतन येथील सुतार काम करणारे नथुराम धनावडे रमेश पाटील डोळ्यात तेल घालून या खारभूमीच्या दरवाज्याच्या तुटफुटीची तातडीने दुरुस्ती करीत असत पंरतू ती परंपरा काळाच्या ओघाने थांबली आणि खारभूमीच्या दरवाज्याचा प्रश्न ऐरणीवर थांबला. मध्यंतरीच्या काळात गेल्या दहा वर्षी देखील यशवंत खारभूमीला फायबरचे दरवाजे बसविले होते पण दोन तीन वर्षात काळाच्या ओघात तेही नष्ट झाले.
गेल्या दोन वर्षातील चक्रीवादळ, कोरोना आणि तुफान पाउस या उद्भवलेल्या परस्थितीत यशवंत खारभूमीची नापिक झालेली शेती वाचविण्यासाठी लोक वर्गणीतून व काही दात्यांनी केलेला आर्थिक मदतीचा हात यामुळे थोडीफार यशवंत खार पिकली होती. परंतु या वर्षी ही खारभूमीचे दरवाजे तुटले आहेत त्यांची दुरुस्ती किंवा फायबरचे दरवाजे न बसल्यास साडेतीनशे हेक्टर जमीन नापिक होणार आहे.
लाकडी झडपा किती टिकणार
प्रत्यक्षात लावणीपूर्वी झडपा बसवणे आवश्यक होते. सध्या लाकडी झडपा लावणार असल्याचे समजते आहे. मात्र समुद्राच्या खार्या पाण्यामुळे लाकडी दरवाजे कसे टिकणार असा संतप्त सवाल शेतकरी विचारु लागलेत. खार्या पाण्यामुळे शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे.
सध्या तात्पुरती व्यवस्था म्हणून यशवंती खारभूमी योजनेत लाकडी दरवाजे लावत आहोत. त्यामुळे शेती भागात पाणी जाणार नाही. भविष्यात शेतीचे नुकसान होणार नाही. यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून फायबरचे दरवाजे लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढील वर्षी तसे दरवाजे लावू.
जगदीश पाटील